Viral Video : बाथरूममध्ये शॉवर लावण्याची भन्नाट ट्रिक; तरुणाचा जुगाड इंटरनेटवर तुफान Viral

Viral Video भारतीयांच्या जुगाड कौशल्याची चर्चा जगभरात होत असते. कमी खर्चात आणि मर्यादित साधनांमध्ये मोठी समस्या सोडवण्याची कला भारतीयांना चांगलीच अवगत आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून, एका तरुणाने घरातील साध्या वस्तूंचा वापर करून बाथरूममध्ये ‘देशी शॉवर’ तयार केला आहे. हा अनोखा प्रयोग पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

घरगुती वस्तूपासून तयार केला शॉवर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणाच्या बाथरूममध्ये शॉवरची सोय नसल्याचे दिसते. मात्र, महागडा शॉवर विकत घेण्याऐवजी त्याने भन्नाट शक्कल लढवली. त्याने घरात वापरल्या जाणाऱ्या लोखंडी घमेल्याचा उपयोग करून एक अनोखा शॉवर तयार केला.

सर्वप्रथम त्या घमेल्याच्या तळभागाला छोट्या-छोट्या छिद्रांची रांग पाडण्यात आली. त्यानंतर ती घमेल बाथरूमच्या छताला घट्ट बसवण्यात आली. पुढे मुख्य पाण्याच्या पाईपची जोडणी थेट त्या घमेल्याला करण्यात आली.

पाण्याचा वर्षाव पाहून लोक थक्क

नळ सुरू करताच घमेल्यातील छिद्रांमधून पाणी अगदी शॉवरप्रमाणे खाली पडू लागते. विशेष म्हणजे, पाण्याचा प्रवाह आणि त्याची रचना पाहून हा साधा जुगाड नसून एखादा प्रोफेशनल प्रयोग असल्याचा भास होतो. कमी खर्चात तयार केलेल्या या ‘देशी शॉवर’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आला असून, अल्पावधीतच हजारो लोकांनी तो पाहिला आहे. अनेक युजर्सनी या कल्पकतेचे कौतुक केले आहे.

एका युजरने मजेशीर प्रतिक्रिया देताना लिहिले, “असा जुगाड पाहून प्लंबरलाही विचार करावा लागेल!” तर दुसऱ्या एका युजरने म्हटले, “कमी खर्चात भारी उपाय… भारतीय जुगाडला तोड नाही.”

भारतीय जुगाडची पुन्हा चर्चा

सध्या हा भन्नाट व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कमी खर्चात उपयोगी उपाय शोधण्याची भारतीयांची सवय पुन्हा एकदा चर्चेत आली असून, या तरुणाच्या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Comment