कर्मचारी निवड आयोग म्हणजेच Staff Selection Commission मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा (SSC CGL 2026) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये एकूण 12,256 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी निर्धारित मुदतीपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
जाहिरात (PDF)
अधिकृत संकेतस्थळ : SSC Official Website
भरतीची मुख्य माहिती
| बाब | माहिती |
|---|---|
| भरती संस्था | स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) |
| परीक्षेचे नाव | SSC Combined Graduate Level Examination 2026 |
| एकूण पदसंख्या | 12,256 |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्जाची अंतिम तारीख | 22 जून 2026 रात्री 11 वाजेपर्यंत |
| Tier-I परीक्षा | ऑगस्ट 2026 |
| Tier-II परीक्षा | डिसेंबर 2026 |
उपलब्ध पदांची यादी
या भरतीद्वारे खालील महत्त्वाच्या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे:
- असिस्टंट ऑडिट ऑफिसर
- असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
- इंस्पेक्टर (Central Excise)
- इंस्पेक्टर (Preventive Officer)
- इंस्पेक्टर (Examiner)
- असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
- सब-इंस्पेक्टर
- एक्झिक्युटिव असिस्टंट
- रिसर्च असिस्टंट
- डिविजनल अकाउंटेंट
- ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
- स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
- ऑफिस सुपरिंटेंडेंट
- ऑडिटर
- अकाउंटेंट / ज्युनियर अकाउंटेंट
- पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक
- टॅक्स असिस्टंट
- सिनियर एडमिन असिस्टंट
आणि इतर विविध पदे.
शैक्षणिक पात्रता
1) असिस्टंट ऑडिट ऑफिसर
- कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
- संबंधित राज्याच्या प्रादेशिक किंवा अधिकृत भाषेचे ज्ञान आवश्यक
2) ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
- कोणत्याही शाखेतील पदवी
- 12वीमध्ये गणित विषयात किमान 60% गुण
किंवा - सांख्यिकी विषयासह पदवी
3) स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
खालील विषयांपैकी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक:
- सांख्यिकी
- गणित
- अर्थशास्त्र
- लोकसंख्याशास्त्र
- Operations Research
- माहिती तंत्रज्ञान
- संगणक शास्त्र
- डेटा सायन्स
- कृत्रिम बुद्धिमत्ता
इत्यादी.
4) इतर सर्व पदे
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक
वयोमर्यादा
01 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असावे:
- किमान वय : 18 वर्षे
- कमाल वय : 32 वर्षे
आरक्षणानुसार सूट
- SC/ST : 5 वर्षे सूट
- OBC : 3 वर्षे सूट
अर्ज शुल्क
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| जनरल / OBC | ₹100 |
| SC / ST / PWD / ExSM / महिला | शुल्क नाही |
निवड प्रक्रिया
SSC CGL भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
- Tier-I संगणक आधारित परीक्षा
- Tier-II परीक्षा
- दस्तऐवज पडताळणी
ऑनलाईन अर्ज कसा कराल?
- SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- नवीन उमेदवारांनी प्रथम नोंदणी (Registration) करावी
- लॉगिन करून SSC CGL 2026 अर्ज फॉर्म भरावा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत
- शुल्क भरून अर्ज अंतिम सबमिट करावा
- भविष्यासाठी अर्जाची प्रिंट जतन करून ठेवा
अर्ज लिंक : Apply Online SSC CGL 2026
महत्त्वाच्या तारखा
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| अर्ज सुरू | सुरू |
| अर्जाची शेवटची तारीख | 22 जून 2026 |
| Tier-I परीक्षा | ऑगस्ट 2026 |
| Tier-II परीक्षा | डिसेंबर 2026 |
उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
- अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो
- फोटो आणि सही निर्धारित आकारात अपलोड करणे आवश्यक आहे
- अंतिम तारखेची वाट न पाहता लवकर अर्ज करावा