PM Kisan Yojana: पुढच्या महिन्यात खात्यात येणार ₹2000? पीएम किसानच्या 23व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

PM Kisan Yojana 23rd Installment Date update देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारकडून पुढील म्हणजेच 23वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेचे 22 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

13 मार्च 2026 रोजी आसाममधील गुवाहाटी येथे आयोजित कार्यक्रमातून 22वा हप्ता जारी करण्यात आला होता. त्यानंतर आता पुढील 23वा हप्ता कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला हा हप्ता मे महिन्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, काही प्रशासकीय कारणांमुळे तो जून किंवा जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होऊ शकतात.

पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी ही कामे आवश्यक

पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामध्ये ई-केवायसी आणि आधार लिंकिंग सर्वात महत्त्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांच्या खात्यात पुढील हप्ता अडकू शकतो.

शेतकरी खालील पद्धतीने ई-केवायसी करू शकतात :

  • पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन ई-केवायसी पूर्ण करणे
  • आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासणे
  • जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी करणे

सरकारकडून लाभार्थी यादीत सतत पडताळणी सुरू असल्यामुळे चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे किंवा ई-केवायसी नसलेल्या शेतकऱ्यांचे हप्ते थांबवले जाऊ शकतात. त्यामुळे सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment