Gold Rate Today 2026 : सोनं-चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सोन्याचे दर कमी झाले होते, त्यानंतर या आठवड्यात पुन्हा दर वाढले. मात्र, आज खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांनी सोन्याच्या किमतींमध्ये घसरण नोंदवली गेली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण-इस्रायल तणाव कमी होण्याचे संकेत मिळाल्यानंतर सोन्याच्या दरात आधी वाढ झाली होती. पण आज पुन्हा बाजारात दर घसरलेले दिसत आहेत.
आजचे २४ कॅरेट सोन्याचे दर
आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. प्रति तोळा सुमारे २,३४० रुपयांनी कमी होत दर १,५१,४८० रुपयांवर आले आहेत.
- ८ ग्रॅम सोनं: १,२१,१८४ रुपये (१,८७२ रुपयांची घसरण)
- १० तोळे: १५,१४,८०० रुपये (२३,४०० रुपयांची घसरण)
२२ कॅरेट सोन्याचे दर
२२ कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली आहे.
- प्रति तोळा: १,३८,८५० रुपये (२,१५० रुपयांची घट)
- ८ ग्रॅम: १,११,०८० रुपये (१,७२० रुपयांची घट)
- १० तोळे: १३,८८,५०० रुपये (२१,५०० रुपयांची घट)
१८ कॅरेट सोन्याचे दर
१८ कॅरेट सोन्याच्या दरातही लक्षणीय घसरण झाली आहे.
- प्रति तोळा: १,३६,६१० रुपये (१,७६० रुपयांची घट)
- ८ ग्रॅम: ९०,८८८ रुपये (१,४०८ रुपयांची घट)
- १० तोळे: ११,३६,१०० रुपये (१७,६०० रुपयांची घट)
सोन्याच्या दरात झालेली ही घसरण खरेदीदारांसाठी चांगली संधी मानली जात आहे. लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असल्यास सध्या दर काही प्रमाणात कमी झाल्याने फायदा होऊ शकतो. मात्र, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि बाजारातील बदलांमुळे पुढील काही दिवसांत दर पुन्हा बदलू शकतात, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी ताजे दर तपासणे आवश्यक आहे.