Kitchen Tips: किचनमध्ये झुरळांचा हैदोस? रात्री ओट्यावर फक्त ‘ही’ पावडर ठेवा; सकाळपर्यंत एकही झुरळ दिसणार नाही!

Cockroaches In The Kitchen tips : घर कितीही स्वच्छ ठेवले तरी किचनमध्ये झुरळांचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो. झुरळांमुळे केवळ घाणच होत नाही, तर अन्न दूषित होऊन आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. बाजारातील केमिकलयुक्त औषधांऐवजी काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही झुरळांना दूर ठेवू शकता. जाणून घ्या प्रभावी उपाय…

तमालपत्राचा वापर

तमालपत्राचा तीव्र सुगंध झुरळांना सहन होत नाही. काही तमालपत्रे चुरून ती झुरळे जास्त दिसणाऱ्या ठिकाणी ठेवा. विशेषतः गॅसजवळ, सिंकखाली किंवा कपाटांच्या कोपऱ्यात ठेवले तर चांगला परिणाम दिसून येतो.

कडुलिंबाचे तेल

कडुलिंबाच्या तेलामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. याचा वास झुरळांना दूर ठेवण्यास मदत करतो. एका स्प्रे बाटलीत पाणी आणि काही थेंब कडुलिंबाचे तेल मिसळून रात्री किचनमध्ये फवारणी करा. नियमित वापर केल्यास झुरळांचा त्रास कमी होऊ शकतो.

लवंग ठेवा

लवंगाचा सुगंध झुरळांना अजिबात पसंत नसतो. झुरळांचा त्रास जास्त असल्यास घराच्या कोपऱ्यात, कपाटांमध्ये किंवा सिंकजवळ ८ ते १० लवंगा ठेवाव्यात. यामुळे झुरळे त्या भागापासून दूर राहतात.

पुदिन्याच्या तेलाचा स्प्रे

पुदिन्याच्या तेलामध्येही कीटक दूर ठेवण्याचे गुण असतात. पाण्यात थोडे मीठ आणि काही थेंब पुदिन्याचे तेल मिसळून स्प्रे तयार करा. हा स्प्रे किचनच्या कोपऱ्यांत, ओट्याजवळ आणि झुरळे दिसणाऱ्या भागात फवारावा.

स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या

घरगुती उपायांसोबतच किचन नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवणेही गरजेचे आहे. रात्री उरलेले अन्न उघडे ठेवू नका आणि सिंकमध्ये साचलेले पाणी त्वरित साफ करा. यामुळे झुरळांची वाढ रोखता येते.

Leave a Comment