March April ladki bahin yojana installment date Update 2026 : राज्यातील पात्र महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत दरमहा ₹1500 सन्मान निधी दिला जातो. मात्र, ई-केवायसी प्रक्रिया आणि पोटनिवडणुकांमुळे काही महिन्यांपासून हा निधी थांबला होता. आता ही अडचण दूर झाली असून लवकरच महिलांच्या खात्यात थकीत रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी 2026 मध्ये शेवटचा ₹1500 चा हप्ता जमा झाला होता. त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. काही महिलांना तर जानेवारीपासूनच रक्कम मिळालेली नाही, त्यामुळे अनेकांच्या मनात आपला अर्ज रद्द झाला का, अशी शंका निर्माण झाली आहे.
दरम्यान, थकीत हप्ते एकत्र देण्याबाबत चर्चा सुरू आहे. काहींच्या मते महिलांना ₹3000 (दोन महिन्यांचे) मिळू शकतात, तर काहींच्या मते ₹4500 (तीन महिन्यांचे) मिळण्याची शक्यता आहे. तर काही अंदाजानुसार ₹5000 ते ₹6500 पर्यंतची रक्कमही एकत्र जमा होऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
30 एप्रिल रोजी ई-केवायसीची मुदत संपल्यानंतर सरकारने अर्जांची पडताळणी पूर्ण केली आहे. त्यामुळे आता निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील काही दिवसांत किंवा लवकरच ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, ई-केवायसी न केलेल्या किंवा निकषात न बसणाऱ्या सुमारे 54 लाख महिलांचा या योजनेतील लाभ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता सुमारे 1 कोटी 89 लाख पात्र महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे. अपात्र लाभार्थी कमी झाल्यामुळे सरकारचे जवळपास ₹1200 कोटींची बचत होणार असल्याचेही समोर आले आहे.
एकूणच, पात्र महिलांसाठी दिलासा देणारी ही बातमी असून, थकीत हप्ते लवकरच खात्यात जमा होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, नेमकी किती रक्कम मिळणार याबाबत अधिकृत घोषणा येणे बाकी आहे.