राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत एकूण 04 महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR)

राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत एकूण 04 महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR)

राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत एकूण 04 महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित संस्थांवर होणार आहे. खाली या चारही GR बाबत परिच्छेदानुसार सविस्तर माहिती दिली आहे.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट ‘ब’ मधील वैद्यकीय अधिकारी संवर्गाची दिनांक 01 जानेवारी 2023 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही ज्येष्ठतासूची पदोन्नती, बदली तसेच सेवाज्येष्ठतेशी संबंधित निर्णयांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संबंधित अधिकाऱ्यांनी या अंतिम यादीची नोंद घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

सन 2025-26 या वित्तीय वर्षासाठी महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डास निवृत्तीवेतन तसेच वेतनेत्तर बाबींसाठी आवश्यक निधी वितरीत करण्यास महिला व बाल विकास विभागाने दि. 13.02.2026 रोजी मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे समाजकल्याण बोर्डाअंतर्गत लाभार्थ्यांना नियमित व वेळेवर आर्थिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा अंतर्गत कार्यरत गट ‘अ’ व गट ‘ब’ (राजपत्रित) अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल (APAR) लिहिण्याबाबतची सुस्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यास नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. या GR मुळे कार्यमूल्यमापन प्रक्रियेत पारदर्शकता, एकसमानता व जबाबदारी वाढण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 अंतर्गत सन 2025-2026 साठी मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाचे वितरण करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शालेय शिक्षण, क्रीडा व संबंधित उपक्रमांसाठी निधीचा सुरळीत वापर होऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.

वरील चारही शासन निर्णय (GR) डाऊनलोड Click Here करा

Leave a Comment