मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करणे बाबत..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करणे बाबत..

ज्या महिलाना लाडकी बहीण योजनाचा लाभ मिळणे बंद झाले आहे, अशा महिलांनी पुढील प्रमाणे विनंती अर्ज भरून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब यांच्या नावे द्यावा.

विनंती अर्ज

दि. : ___ / ___ / 2026

प्रती,
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब,
(जिल्हा टाका) – पिनकोड

विषय : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा सुरू करणेबाबत.

महोदय,

मी खाली सही करणारी अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणीकृत लाभार्थी आहे. सदर योजनेअंतर्गत मला नियमित लाभ मिळत होता. मात्र काही कारणास्तव माझा या योजनेचा लाभ _______ पासून बंद झाला आहे. त्यामुळे मला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मी सत्यप्रतिज्ञेवर नमूद करते की, माझी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत नाही. तसेच माझ्या कुटुंबाच्या नावावर कोणतेही चारचाकी वाहन नोंदणीकृत नाही.

याशिवाय माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखांपेक्षा कमी असून मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी व निकष पूर्ण करत आहे. तरी माझ्या आधार कार्डची व संबंधित कागदपत्रांची योग्य ती चौकशी करून माझा बंद झालेला लाभ पुन्हा सुरू करण्यात यावा, ही नम्र विनंती आहे.

यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जोडलेली आहेत. तरी माझ्या अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करून मला न्याय द्यावा, ही नम्र विनंती.

आपली कृपा होईल, ही अपेक्षा.

धन्यवाद.

ठिकाण : ___________
तारीख : ___ / ___ / 2026

आपली नम्र,
नाव : __________________
आधार क्रमांक : ______________
अर्ज क्रमांक : ______________
पत्ता : _____________________

अर्जदाराची सही : _____________

आवश्यक कागदपत्रे :

  1. लाभार्थीचा आधार कार्ड झेरॉक्स
  2. लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड झेरॉक्स
  3. लाभार्थीचा टी.सी. (TC) झेरॉक्स
  4. लाभार्थीचे रेशन कार्ड झेरॉक्स

Leave a Comment