Funny Viral Video : सोशल मीडियावर दररोज लग्नातील भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ भावुक करणारे असतात, तर काही इतके मजेशीर असतात की पाहणारे हसून लोटपोट होतात. सध्या असाच एका वरातीतील भन्नाट व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेवाच्या मित्राने घोडीवर बसून असा काही ‘नागिन डान्स’ केला आहे की, पाहणाऱ्यांचे हसू थांबेनासे झाले आहे.
नेमकं व्हिडिओमध्ये काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नवरदेव मोठ्या थाटामाटात घोडीवर बसलेला दिसत आहे. बँड-बाजेच्या तालावर वरात उत्साहात पुढे जात असताना अचानक नवरदेवाचा एक मित्र पुढे येतो आणि थेट घोडीवर चढतो. सुरुवातीला सर्वांना तो फक्त मजा करत असल्यासारखा वाटतो, पण पुढच्या क्षणी तो भन्नाट अंदाजात नागिन डान्स सुरू करतो.
घोडीवर बसून तो कधी उजवीकडे तर कधी डावीकडे सापासारखे हावभाव करत भन्नाट स्टेप्स मारताना दिसतो. त्याचा अतरंगी अंदाज पाहून वऱ्हाडीही मोठ्याने हसू लागतात. आसपासचे लोक मोबाईलमध्ये हा क्षण कैद करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा
हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @RebelliousPari8 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका यूजरने, “हा तर नागिन डान्सचा नेक्स्ट लेव्हल आहे,” अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने, “भाऊ आता नागमणी घेऊनच थांबणार बहुतेक!” असे लिहित मजा घेतली. आणखी एका नेटकऱ्याने “याला थेट टीव्ही मालिकेत संधी द्या,” अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोक पुन्हा पुन्हा पाहून मजा घेत आहेत.