सुवर्णसंधी पशुसंवर्धन विभागात 3103 पदासाठी भरती 2026

Department of Animal Husbandry Bharti 2026 : राज्यातील पशुवैद्यकीय पदवीधर आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी अत्यंत दिलासादायक वृत्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागांच्या भरतीचा मार्ग आता मोकळा झाला असून, विभागात तब्बल ३ हजार १०३ पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात केलेल्या विशेष पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या भरतीसाठी परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.

भरतीचे स्वरूप आणि या ऐतिहासिक भरती प्रक्रियेद्वारे

पशुधन विकास अधिकारी (गट-अ) संवर्गातील २ हजार ७९५ जागा आणि सहाय्यक आयुक्त (गट-अ) संवर्गातील ३०८ जागा भरल्या जाणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून पार पडणार असून, ११ जून २०२६ रोजी मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन मुख्य केंद्रांवर संगणक आधारित चाळणी परीक्षा (सीबीटी) घेतली जाईल. परीक्षेची वेळ सायंकाळी ५:३० ते ७:०० अशी निश्चित करण्यात आली असून, या परीक्षेतील कामगिरीवरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

अर्थव्यवस्थेला मिळणार बळ

राज्यातील ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय गेता मध्गा कर्मत्तायांच्या कमतरतेमुळे संकटात सापडली होती. पशुधनाचे लसीकरण, आरोग्य तपासणी आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना रिक्त पदांमुळे यंत्रणेवर मोठा ताण येत होता.

या मेगाभरतीमुळे विभागाला एकाच वेळी मोठ्या संख्येने अधिकारी मिळणार असल्याने पशुसंवर्धन यंत्रणा अधिक सक्षम आणि वेगवान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही भरती केवळ नोकरीची संधी नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद

Leave a Comment