MPSC मार्फत विविध पदांच्या 5707 जागांसाठी मेगाभरती; पदवीधरांना सुवर्णसंधी

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने गट-क संवर्गातील विविध पदांसाठी 2026 ची भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे राज्यातील विविध विभागांमध्ये एकूण 5,707 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 5 ऑगस्ट 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

भरतीचा संक्षिप्त तपशील

  • भरती संस्था: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
  • भरतीचे नाव: MPSC Group C Recruitment 2026
  • एकूण रिक्त पदे: 5,707
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
  • अर्जाची अंतिम तारीख: 5 ऑगस्ट 2026
  • पूर्व परीक्षा (ऑफलाइन): 25 ऑक्टोबर 2026

पदनिहाय रिक्त जागा

पदाचे नावपदसंख्या
उद्योग निरीक्षक9
तांत्रिक सहाय्यक3
कर सहाय्यक282
सहायक मोटार वाहन निरीक्षक461
लिपिक-टंकलेखक (विविध विभाग)1,864
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)1,539
वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल11
सहाय्यक अधीक्षक11
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक)254
लिपिक-टंकलेखक (अन्न नागरी पुरवठा, आदिवासी विकास, महसूल विभाग इ.)944
लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग)339
एकूण5,707

शैक्षणिक पात्रता

पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.

  • उद्योग निरीक्षक: अभियांत्रिकी पदवी, तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
  • तांत्रिक सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • कर सहाय्यक: पदवी तसेच मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट.
  • सहायक मोटार वाहन निरीक्षक: दहावी उत्तीर्ण तसेच ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा अथवा पदवी.
  • लिपिक-टंकलेखक: पदवी आणि निर्धारित मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन पात्रता.
  • ग्राम महसूल अधिकारी (तलाठी): कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • सहाय्यक अधीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी: मत्स्यविज्ञान (B.F.Sc.) मध्ये किमान द्वितीय श्रेणीची पदवी.
  • नोंदणी व मुद्रांक विभागातील लिपिक-टंकलेखक: पदवी आणि आवश्यक टंकलेखन पात्रता.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदासाठीची सविस्तर पात्रता अधिकृत अधिसूचनेतून तपासावी.

वयोमर्यादा

  • वयाची अट: 1 ऑक्टोबर 2026 रोजी 19 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अनाथ उमेदवारांना: 5 वर्षांची वयोमर्यादा शिथिलता.

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹394
  • मागासवर्गीय / EWS / अनाथ: ₹294
  • माजी सैनिक: ₹44

निवड प्रक्रिया

भरती प्रक्रिया आयोगाच्या नियमानुसार पार पडेल. पात्र उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा (लागू असल्यास) आणि संबंधित पदासाठी आवश्यक इतर निकषांनुसार केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू: सुरू
  • अर्जाची अंतिम तारीख: 5 ऑगस्ट 2026
  • पूर्व परीक्षा: 25 ऑक्टोबर 2026

अर्ज कसा कराल?

  1. MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  2. Group C Recruitment 2026 या भरतीची जाहिरात उघडा.
  3. पात्रता आणि आवश्यक सूचना काळजीपूर्वक वाचा.
  4. ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. परीक्षा शुल्क भरून अर्ज अंतिम स्वरूपात सादर करा.
  6. भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट किंवा PDF जतन करून ठेवा.

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी MPSC Group C Recruitment 2026 ही मोठी भरती ठरू शकते. तब्बल 5,707 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना यात संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह वेळेत ऑनलाइन अर्ज करावा आणि परीक्षेची तयारी सुरू ठेवावी.

Leave a Comment