आठवा वेतन आयोग : किमान वेतन थेट 54 हजार? पे-लेव्हलनुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता जाहीर
आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) संदर्भात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव वेतन आयोग समितीकडून प्राथमिक स्वरूपात मांडण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन लक्षणीय वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सातव्या वेतन आयोगामध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन 18,000 रुपये इतके निश्चित केले होते. मात्र, महागाई दर, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता आठव्या वेतन आयोगामध्ये किमान वेतनामध्ये मोठी वाढ सुचवण्यात आली आहे. नवीन प्रस्तावानुसार किमान वेतन थेट 54,000 रुपये इतके निश्चित करण्याबाबत विचार सुरू आहे.

आठवा वेतन आयोग लागू झाल्यास केवळ किमान वेतनातच नव्हे, तर सर्व पे-लेव्हलनुसार वेतनश्रेणीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टरमध्येही सुधारणा सुचवण्यात आली असून, सातव्या वेतन आयोगात लागू असलेल्या फिटमेंट फॅक्टरपेक्षा अधिक वाढीव फिटमेंट फॅक्टर देण्याची शिफारस करण्यात आली आहे. याचा थेट फायदा सर्व श्रेणीतील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
वेतन आयोग समितीने पे-लेव्हलनुसार सुधारित वेतनश्रेणीचा संभाव्य तक्ता तयार केला असून, यामध्ये लेव्हल-1 पासून उच्च अधिकाऱ्यांपर्यंत सर्व पदांसाठी सुधारित मूळ वेतन दर्शवण्यात आले आहे. हा तक्ता अंतिम नसून, तो केवळ शिफारसींच्या स्वरूपात सादर करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, आठवा वेतन आयोगाचा हा सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या ही माहिती प्रस्तावित स्वरूपात असून, अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतरच घेतला जाणार आहे.
केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, आठवा वेतन आयोग लागू झाल्यास पगारासोबतच निवृत्ती वेतन, महागाई भत्ता तसेच इतर भत्त्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात अधिक सविस्तर माहिती, पे-लेव्हलनुसार संभाव्य वेतनश्रेणी तक्ता आणि पुढील अपडेट्स जाणून घ्या